शिवसेनेतून उमेदवारी मिळावी यासाठी ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकेच्या निवडणुकीत ३३४८ इच्छुकांनी मुलाखतीचे अर्ज

Dec 22, 2025 - 13:49
Dec 23, 2025 - 15:05
 0  1
शिवसेनेतून उमेदवारी मिळावी यासाठी ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकेच्या निवडणुकीत ३३४८ इच्छुकांनी मुलाखतीचे अर्ज

    शिवसेनेतून उमेदवारी मिळावी यासाठी ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकेच्या निवडणुकीत ३३४८ इच्छुकांनी मुलाखतीचे अर्ज भरले आहेत. यात १५४८ महिलांनी उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. शनिवार पासून हा उमेदवारांच्या मुलाखतींना सुरवात होणार आहे. महानगरपालिकामधील सदस्य संख्येच्या चार ते पाच पट इच्छुक असल्याने उमेदवारांचा कस लागणार आहे.

                                    शिवसेनेकडून  महापालिका निवडणूक उमेदवार पदासाठी इच्छुकांची मुलाखतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात कल्याण, डोंबिवाली, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर या सहा महापालिकेचा समावेश आहे. एकूण ६१८  पदांसाठी शिवसेना पक्ष कार्यालयातून या सहा महापालिकेतील ३३४८ इच्छुकांनी मागील चार दिवसात मुलाखतीसाठी अर्ज सादर केल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. 
                     

                                खासदार म्हस्के म्हणाले ठाणे महापालिकेत १३१ सदस्य असून पक्ष कार्यालयात १२७७ अर्ज सादर केले आहे. ११२ सदस्य संख्या असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी ६८२ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहे. उल्हासनगर महापालिकेची सदस्य संख्या ७८ असून यासाठी शिवसेनेकडे ३८५ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहे.भिवंडी निजामपूर महापालिकेत ९० जागा असून यासाठी १७६ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत.९६ सदस्य संख्या असलेल्या मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेत उमेदवारी मिळावी यासाठी ३३२ इच्छुकांनी अर्ज केले आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती वाशी येथे शनिवारी होतील, असे खासदार म्हस्के म्हणाले, इथे १११ सदस्य संख्या असून ४९६ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना महायुतीमधून महापालिका निवडणूक लढणार असल्याने महापालिकांच्या स्तरावर शिवसेना आणि भाजपची जागा वाटपाची तयारी सुरू दिसतेय.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow