राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाची प्रचार रॅलीला जोरदार सुरुवात...
ठाणे:- ठाणेमहानगर पालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी कोणालाही मिळो, पण गद्दारी गाडणारच, असा निर्धार इच्छुक उमेदवारांनी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाने प्रचार रॅलीला सुरुवात देखील केली आहे. ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी अद्याप कोणत्याच पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले नसतानाही आधीच प्रचारात डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली तसेच ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाने प्रचाराला जोरदार सुरुवात केलेली दिसून येते.
कळव्यातील प्रभाग क्र. २३ आणि २४ मध्ये गुरुवारी राष्ट्रवादी च्या वतीने रॅली काढून प्रचाराला सुरुवात केली.ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन गुरुवारी सकाळी रॅलीला सुरुवात करण्यात आली. तर संध्याकाळी विटवा येथे प्रचार करण्यात आली.
What's Your Reaction?