"ठाणे महापालिका निवडणूक: शिवसेनेचा वर्चस्व, महायुतीत तणाव
ठाणे महानगरपालिका निवडणुक ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्याच्या आधीच महायुतीची घोषणा झाली. परंतु त्याचे पडसाद आता ठाण्यात उमटले आहेत. भाजपमध्ये अनेक नाराजांनी थेट काम न करण्याचा इशारा देत युती तोडण्याची भूमिका घेतली. शिंदेसेनेतही काही नाराज असले, तरी ते आपली नाराजी जाहीर करीत नाहीत. मुंबईत शिंदेसेनेने जास्त जागांवर दावा करू नये, याकरिता युतीला विरोध करून शिंदेसेनेने नाक दाबण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांना धरून आहेत, कारण, त्यांची ताकद बरीच क्षीण झाली असून, स्वबळावर लढायची ताकद दिसत नाही. राज्यात तीन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतराचा ठाणे हा केंद्रबिंदू ठरला. त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे नाक मानले जात आहे. आपला गड ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे.
आता काय आहेत राजकीय समीकरणे? सध्या ठाण्यात शिवसेनेचा वर्चस्व दिसत आहे.
शिंदेसेनेकडे ७९, भाजपकडे २४, उद्धवसेनेकडे ०३, काँग्रेसकडे ०३, मनसे ०, राष्ट्रवादी (शरद पवार) १३ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) ११ चे संख्याबळ आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे ठाण्यातील समीकरणे बदलतील का, या दृष्टीने चाचपणी सुरू झाली आहे. तर राष्ट्रवादीने (शरद पवार) कळवा, मुंब्रा येथे अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. तर काँग्रेसलाही मुंब्रा येथे उमेदवारी हवी असल्याने त्यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे.
पालिकेतील ३ वर्षांचे प्रशासक राज संपणार?
ठाणे महापालिकेची मुदत ५ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायप्रविष्ट होत्या. त्यामुळे महापालिकेवर मागील तीन वर्ष प्रशासकीय राजवट होती. परंतु आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने प्रशासकीय राजवटही संपुष्टात येणार आहे.
महापालिकेत कुणाची होती सत्ता?
शिवसेना ६७
भाजप २३
राष्ट्रवादी काँग्रेस ३५
काँग्रेस ०३
मनसे ०१
एमआयएम०२
What's Your Reaction?